स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे जयंतीनिमित्त कराडमध्ये भव्य जाहीर व्याख्यान सुधारणावादी विचारवंत श्री. पैगंबर शेख यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन


कराड, दि. १५ : विद्या मोरे :  अखिल भारतीय मराठा महासंघ, सातारा जिल्हा यांच्या वतीने स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दि. २० मे रोजी यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन, कराड येथे भव्य जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या विशेष कार्यक्रमात सुप्रसिद्ध सुधारणावादी विचारवंत श्री. पैगंबर शेख हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून, छत्रपती संभाजीराजे महाराजांचे अद्वितीय शौर्य, राष्ट्रनिष्ठा, धर्मरक्षण आणि सामाजिक विचार यांवर ते प्रभावी मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमास कराड नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष श्री. प्रतापराव साळुंखे, बांधकाम सभापती श्री. अख्तर आंबेकरी, कराड अर्बन बँकेचे माजी चेअरमन डॉ. सुभाषराव एरम, सीए श्री. दिलीप गुरव, माजी नगरसेवक श्री. अशोकराव पाटील, श्री. अतुल शिंदे, श्री. हणमंतराव पवार, श्री. आनंदराव लादे, कोयना सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन श्री. साहेबराव शेवाळे तसेच कालगावचे लोकनियुक्त सरपंच श्री. सोमनाथ चव्हाण आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. विवेक कुराडे-पाटील, अशोक चव्हाण सर, सौ. विद्या मोरे, सौ. वैशाली जाधव, श्री. युवराज कुराडे-पाटील, श्री. अमर पाटील, श्री. किरण पाटील, श्री. महेश पाटील, श्री. उत्तम भोसले, श्री. सुरज जाधव, श्री. धनाजी माने, श्री. विनोद पाटील आणि श्री. राहुल बर्गे हे विशेष परिश्रम घेत आहेत.

छत्रपती संभाजीराजे महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाचा जागर करून स्वराज्याच्या विचारांची मशाल नव्या पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्या या कार्यक्रमास कराड शहर व परिसरातील शिवप्रेमी नागरिकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. अनिल घराळ (बापू) यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार