साताऱ्यात लायन्स इंटरनॅशनलचा दिमाखदार प्रांतिय पदाधिकारी सत्कार सोहळा“LEAD TO WIN” संकल्पनेतून समाजसेवेचा नवा संदेश; नव्या पदाधिकाऱ्यांचा जल्लोषात गौरव
कराड प्रतिनिधी : विद्या मोरे
सातारा येथे लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234-D1, रिजन-2 यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 2026-27 वर्षातील प्रांतिय पदाधिकारी सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. “LEAD TO WIN” या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित या भव्य सोहळ्यात नव्याने निवड झालेल्या प्रांतिय पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. विविध लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सत्कारमूर्तींचे जल्लोषात स्वागत केले.
या वेळी प्रांतपाल MJF लायन राजेंद्रभाई शहा कांसवा, प्रथम उपप्रांतपाल MJF लायन डॉ. किरण खोराटे तसेच द्वितीय उपप्रांतपाल MJF लायन मंगेश दोशी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या अमोल मोहिते यांनी आपल्या मनोगतात लायन्स इंटरनॅशनलच्या सामाजिक, शैक्षणिक आणि मानवसेवेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी अशा सेवाभावी संस्थांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रांतपाल MJF लायन राजेंद्रभाई शहा कांसवा यांनी आपल्या भाषणात लायन्स परिवाराने समाजसेवा, आरोग्य, शिक्षण आणि मानवहिताच्या कार्यात अधिक जोमाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. “सेवा हीच खरी ताकद असून लायन्स इंटरनॅशनलचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे,” असे ते म्हणाले.
या सोहळ्यास MJF लायन प्रभाकर आंबेकर माजी प्रांतपाल, MJF लायन राजेंद्र शहा माजी प्रांतपाल, MJF लायन मिलिंद शहा माजी प्रांतपाल, PMJF लायन जगदीश पुरोहित माजी प्रांतपाल, MJF लायन कुशावर्त जाचक माजी प्रांतपाल, PMJF लायन भोजराज नाईक निंबाळकर माजी प्रांतपाल तसेच रिजन-2 चे रिजन चेअरमन MJF लायन निलम लोंढे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान MJF लायन पांडुरंग शिंदे माजी प्रांतपाल यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी लायन्स परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत सेवा कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त केली. उपस्थित मान्यवरांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत आगामी काळात विविध सामाजिक उपक्रम अधिक व्यापक स्तरावर राबविले जातील, असा विश्वास व्यक्त केला.
या भव्य सोहळ्याचे आयोजन लायन्स क्लब ऑफ कराड, लायन्स क्लब ऑफ कॅम्प सातारा, लायन्स क्लब ऑफ सातारा एम.आय.डी.सी., लायन्स क्लब ऑफ युनायटेड सातारा, लायन्स क्लब ऑफ जनसेवा सातारा, लायन्स क्लब ऑफ फलटण, लायन्स क्लब ऑफ मसूर, लायन्स क्लब ऑफ सातारा अजिंक्य, लायन्स क्लब ऑफ सातारा सह्याद्री, लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डन, लायन्स क्लब ऑफ कराड नक्षत्र, लायन्स क्लब ऑफ फलटण प्लॅटिनम, लायन्स क्लब ऑफ कराड सिटी, लायन्स क्लब ऑफ कराड मेन, लायन्स क्लब ऑफ फलटण वेलनेस वॉरिअर, लायन्स क्लब ऑफ फलटण प्लॅटिनम स्टार आणि लायन्स क्लब ऑफ बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यक्रमासाठी सातारा, कराड, फलटण तसेच विविध भागांतून मोठ्या संख्येने लायन्स सदस्य उपस्थित होते. संपूर्ण सभागृह उत्साह, जल्लोष आणि सेवाभावाच्या वातावरणाने भारावून गेले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन फडतरे यांनी उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडले,तर शेवटी बाळासाहेब शिरकांडे यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, लायन्स सदस्य आणि आयोजक संस्थांचे आभार मानले. त्यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.,
हा भव्य सोहळा Hotel Preeti Executive येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
Comments
Post a Comment