हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात कराड आगाराचा द्वितीय क्रमांक

कराड : विद्या मोरे ;   हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानामध्ये कराड आगाराने पुणे विभागातील ‘अ’ गटात द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.

या यशाबद्दल पुणे प्रदेशाच्या मा. ताम्हणकर मॅडम, प्रादेशिक व्यवस्थापक मा. कांबळे साहेब, प्रादेशिक अभियंता तसेच पुणे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते कराड आगाराच्या वरिष्ठ आगार व्यवस्थापक श्रीमती शर्मिष्ठा पोळ यांचा मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

कराड आगारातील अधिकारी, कर्मचारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या यशाबद्दल श्रीमती शर्मिष्ठा पोळ व संपूर्ण कराड आगाराचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार