मैथिली खुस्पे यांच्या नेतृत्वाखाली कोटा अकॅडमी चे नवे पाऊल; ज्युनियर आयएएस फाउंडेशन’द्वारे विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवांची तयारी ;१ जुलैपासून उपक्रमाला सुरुवात

कराड : विद्या मोरे
अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांप्रमाणेच प्रशासकीय सेवांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोटा अॅकॅडमीने इयत्ता सातवी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्युनियर आयएएस फाउंडेशन प्रोग्राम’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात १ जुलैपासून होणार असून विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच स्पर्धा परीक्षांची दिशा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सातवी ते अकरावीसाठी विशेष अभ्यासक्रम
या कार्यक्रमांतर्गत इयत्ता सातवी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यूपीएससी, एमपीएससी, एसएससी, एनडीएसह विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांची प्राथमिक तयारी विद्यार्थ्यांना करून दिली जाणार आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील दोन दशकांचा अनुभव
गेल्या २० वर्षांत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या क्षेत्रात हजारो यशस्वी डॉक्टर व अभियंते घडवून कोटा अॅकॅडमीने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. फाउंडेशन, आयआयटी-जेईई आणि नीटसारखे उपक्रम यशस्वीपणे राबवल्यानंतर आता प्रशासकीय सेवांच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

इंग्रजी माध्यमातून सर्व विषयांचे अध्यापन
कोटा अॅकॅडमीच्या संचालिका मैथिली खुस्पे यांनी सांगितले की, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, पर्यावरण, अर्थशास्त्र, विज्ञान तसेच बुद्धिमत्ता (सीसॅट) हे विषय इंग्रजी माध्यमातून शिकवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला जाणार आहे.

प्रशासकीय संस्थांना शैक्षणिक भेटी
केवळ पुस्तकी ज्ञानापुरता अभ्यास मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा आणि विधानपरिषद यांसारख्या संस्थांना शैक्षणिक भेटी घडवून आणल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रशासनाची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांशी थेट संवादाची संधी
आजी-माजी आयएएस, आयपीएस आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची विशेष व्याख्याने आयोजित केली जाणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : डॉ. महेश खुस्पे
या उपक्रमाचा लाभ घेऊन भविष्यात सक्षम प्रशासकीय अधिकारी घडावेत, हा उद्देश असल्याचे सांगत कोटा अॅकॅडमीचे संचालक डॉ. महेश खुस्पे यांनी सातवी ते अकरावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार