रिजन चेअरमन लायन महेंद्र कदम यांनी विविध लायन्स क्लबच्या मार्गदर्शकांच्या भेटीतून जाणून घेतले अनुभव आणि अपेक्षा

 कराड ; विद्या मोरे
 आगामी लायन्स वर्षासाठी रिजन चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारणारे ला.महेंद्र कदम यांनी रिजनमधील विविध लायन्स क्लबचे मार्गदर्शक, ज्येष्ठ पदाधिकारी आणि सदस्य यांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या अनुभवांचा लाभ घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी क्लबच्या अपेक्षा, अडचणी आणि भविष्यातील कार्यदिशा जाणून घेत नव्या वर्षासाठीच्या संकल्पना मांडल्या.
लायन महेंद्र कदम यांनी रिजन अंतर्गत असलेल्या विविध क्लबांना भेटी देत पदाधिकारी, सदस्य आणि मार्गदर्शकांशी सविस्तर संवाद साधला. लायन्स चळवळीच्या वाढीसाठी वरिष्ठ सदस्यांचे अनुभव महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी त्यांचे मार्गदर्शन घेतले. क्लबच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी, सदस्यसंख्या वाढ, नवीन नेतृत्व घडविणे, सेवा प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी आणि समाजोपयोगी उपक्रमांचा विस्तार यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी लायन्स क्लब सातारा युनायटेडचे लायन अनिल कदम, लायन नरेंद्र रोकडे, लायन बाळासाहेब शिरकांडे यांच्यासह विविध क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. नव्या लायन्स वर्षात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, युवक विकास आणि सामाजिक बांधिलकी जपणारे नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्याचा मानस महेंद्र कदम यांनी व्यक्त केला. प्रत्येक क्लबने आपल्या परिसरातील गरजांनुसार सेवा उपक्रम राबवून लायन्सचे कार्य अधिक व्यापक करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

"संघटनेची खरी ताकद तळागाळातील सदस्यांमध्ये असते. प्रत्येक सदस्याला सोबत घेऊन काम केल्यास सदस्यसंख्या वाढते, संघटना बळकट होते आणि सेवा कार्यालाही नवी दिशा मिळते," असे मत महेंद्र कदम यांनी व्यक्त केले. रिजनमधील सर्व क्लबांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

दौऱ्यादरम्यान विविध क्लबच्या मार्गदर्शकांनी आणि ज्येष्ठ लायन्स सदस्यांनी आपले अनुभव, सूचना आणि अपेक्षा मांडल्या. त्यांच्या मार्गदर्शनाचा आगामी कार्यकाळात निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास महेंद्र कदम यांनी व्यक्त केला. विविध क्लबतर्फे त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यांच्या या संवाद आणि संपर्क मोहिमेमुळे रिजनमधील लायन्स सदस्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी वर्षासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार