कराड सर्किट हाऊस येथे मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक; कुणबी दाखला अडचणींवर सविस्तर चर्चा
कराड : विद्या मोरे
संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार मराठा समाजाला ‘कुणबी दाखले’ काढताना येणाऱ्या प्रशासकीय अडचणी व त्रुटी दूर करण्याच्या उद्देशाने कराड व पाटण तालुक्यातील मराठा बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक कराड सर्किट हाऊस येथे पार पडली.
या बैठकीत कुणबी दाखला प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या कागदपत्रांतील अडचणी समजून घेऊन उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
मान्यवरांचा सहभाग; प्रशासकीय अडचणींवर उपाययोजनांवर भर
या उपक्रमात विविध सामाजिक व संघटनात्मक पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे संस्थापक सचिव रणजितनाना पाटील, कराड वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. दिपक थोरात, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल घर्हाळबापू, उपाध्यक्ष किरण पाटील तसेच मराठा सेवक सर्जेराव पानवळ, प्रमोद जगदाळे, हरिभाऊ पाटील, संतोषनाना पाटील आणि अभय चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दर आठवड्याला शिबिर घेण्याचा निर्णय
कराड सर्किट हाऊस येथे दर आठवड्याला विशेष शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कराड व पाटण तालुक्यातील मराठा बांधवांनी या शिबिरात सहभागी होऊन कुणबी दाखला प्रक्रियेतील अडचणी दूर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले.
जिल्हाधिकारी स्तरावर पाठपुरावा
संकलित करण्यात आलेल्या सर्व अडचणी सातारा जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
संपर्क (अधिक माहितीसाठी):
रणजितनाना पाटील – 9922750444
किरण पाटील – 7499720526
हरिभाऊ पाटील – 9922239528
सर्जेराव पानवळ – 9860595377
प्रमोद जगदाळे – 9561305777
संतोष पाटील – 9511616435
Adv. दिपक थोरात – 9730 604 604
— मराठा क्रांती मोर्चा, कराड तालुका
— सकल मराठा समाज, कराड तालुका
Comments
Post a Comment