सहकारच्या कप-बशी विरुद्ध संस्थापकांचा नारळ; य. मो. कृष्णा कारखाना निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार
कराड : विद्या मोरे : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून सहकार पॅनेलला ‘कप-बशी’ तर संस्थापक पॅनेलला ‘नारळ’ हे चिन्ह मिळाले आहे. कारखान्याच्या २१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत दोन्ही प्रमुख पॅनेलचे उमेदवार निश्चित झाले असून आता प्रचाराच्या रणधुमाळीला वेग येणार आहे.
सहकार पॅनेलकडून गट क्रमांक १ मध्ये धोंडीराम जाधव, जगदीश जगताप व आनंद खबाले, गट क्रमांक २ मध्ये अरविंद पाटील, दयाराम पाटील व बाजीराव थोरात, तर गट क्रमांक ३ मध्ये दत्तात्रय देसाई, लिंबाजी पाटील व संभाजीराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गट क्रमांक ४ मध्ये जयवंत मोरे, सत्यजीत पाटील व सुनील पाटील, गट क्रमांक ५ मध्ये बाबासो शिंदे व संग्राम पाटील, तर गट क्रमांक ६ मध्ये सुरेश भोसले व बाजीराव निकम हे निवडणूक रिंगणात आहेत.
महिला राखीव गटातून सुजाता जाधव व सुनिता शेवाळे, अनुसूचित जाती-जमाती गटातून छबन कांबळे, भटक्या विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटातून अविनाश खरात आणि इतर मागास प्रवर्ग गटातून बाळासो जगताप यांना सहकार पॅनेलने उमेदवारी दिली आहे.
संस्थापक पॅनेलकडून गट क्रमांक १ मध्ये आनंदा तुकाराम जगताप, प्रताप धोंडीराम जगताप व दुर्योधन खबाले, गट क्रमांक २ मध्ये संतोष थोरात, प्रतापराव पाटील व शांताराम पाटील, तर गट क्रमांक ३ मध्ये सुरेश बाबुराव पाटील, सुभाष पाटील व किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
गट क्रमांक ४ मध्ये जयकर शिंदे, महेश पवार, महेश पाटील व उदयसिंह शिंदे, गट क्रमांक ५ मध्ये सुरेश पाटील व माणिकराव मोरे, तर गट क्रमांक ६ मध्ये अविनाश मोहिते व दीपक कणसे हे उमेदवार आहेत. महिला राखीव गटातून अर्चना मोहिते व विजया पाटील, अनुसूचित जाती-जमाती गटातून सुधीर रोकडे, भटक्या विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटातून दिलीप गलांडे आणि इतर मागास प्रवर्ग गटातून प्रकाश श्रीखंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, गट क्रमांक १ मधून विश्वास जाधव यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. चिन्ह वाटपानंतर आता सहकारच्या कप-बशी आणि संस्थापकांच्या नारळ या चिन्हांवर थेट लढत रंगणार असून कारखाना कार्यक्षेत्रातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रचाराला वेग येण्यास सुरुवात झाली असून सभासदांचे लक्ष आता या प्रतिष्ठेच्या निवडणुकीकडे लागले आहे.
Comments
Post a Comment