वांगीत सभासद-शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विकासाच्या मुद्द्यावर जयवंतराव भोसले सहकार पॅनलला भक्कम पाठिंबा : डॉ. सुरेशबाबा भोसले यांच्या नेतृत्वावरील विश्वास कायम; वांगीतील सभेत विकासकामांचा आढावा
कराड : विद्या मोरे
वांगी, ता. कडेगाव : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ वांगी येथे भव्य जाहीर सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेला सभासद, ऊस उत्पादक शेतकरी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गेल्या ११ वर्षांच्या प्रगतीचा आढावा
सभेत कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेशबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षांत कारखान्याने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा सविस्तर आढावा मांडण्यात आला. आर्थिक शिस्त, उत्पादन क्षमता वाढ, सभासदांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना आणि शेतकरी हितासाठी घेतलेल्या विकासात्मक निर्णयांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
सभासद व शेतकरी हिताला प्राधान्य
कारखान्याने शेतकरी आणि सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या असल्याचे वक्त्यांनी सांगितले. सभासदांचा विश्वास आणि शेतकऱ्यांचे सहकार्य यामुळेच कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला असून विकासाची वाटचाल सातत्याने सुरू असल्याचे नमूद करण्यात आले.
भविष्यातील योजनांवर भर
कारखान्याला अधिक सक्षम आणि प्रगत करण्यासाठी आखण्यात आलेल्या भविष्यातील महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती सभेत देण्यात आली. शेतकरी आणि सभासदांच्या पाठबळाच्या जोरावर ही प्रगती अधिक वेगाने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
‘कपबशी’ चिन्हासमोर मतदानाचे आवाहन
येत्या २१ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या सर्व अधिकृत उमेदवारांना ‘कपबशी’ चिन्हासमोर शिक्का मारून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन उपस्थित सभासद आणि शेतकऱ्यांना करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी श्री. पृथ्वीराज देशमुख, श्री. संग्राम देशमुख, पैलवान चंद्रहार पाटील, सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन दिलीप सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मोहिते यांच्यासह शेतकरी, ऊस उत्पादक, सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment