एमएचटी-सीईटीत लिगाडे-पाटील ज्युनिअर कॉलेजची दैदिप्यमान कामगिरी सातारा जिल्ह्यात अव्वल यश; आयआयटी बॉम्बे, आयआयटी हैदराबाद व एनआयटी सुरतकलमध्ये विद्यार्थ्यांची निवड
कराड, ता. ३० : विद्या मोरे ; विद्यानगर (सैदापूर) येथील लिगाडे-पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कराडने एमएचटी-सीईटी २०२६ परीक्षेत सातारा जिल्ह्यात अव्वल यश संपादन करत आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पर्सेंटाइल मिळविण्याबरोबरच जोसा (JoSAA) राऊंड-१ प्रवेश प्रक्रियेत देशातील प्रतिष्ठित आयआयटी व एनआयटी संस्थांमध्ये प्रवेश निश्चित करून कॉलेजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
समृद्धी आंबेकरची उज्ज्वल कामगिरी
एमएचटी-सीईटीमध्ये समृद्धी आंबेकर हिने ९९.९८ पर्सेंटाइल मिळवत गणित व रसायनशास्त्र या दोन्ही विषयांत १०० पर्सेंटाइल मिळविण्याचा मान मिळविला. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा राज्यभर दखल घेण्यात आली.
अनेक विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
या परीक्षेत सायली लेंडवे (९९.८४), राहुल गोडसे (९९.७३), गौरव भोसले (९९.७२), स्वरूप येळपळे (९९.६२), अदिती पाटील (९९.२९), नंदिनी शिंदे (९९.२०), अनुष्का मोहिते (९९.०४), अनन्या देशमुख (९८.८८), अस्मिता पवार (९८.७७), श्रीकांत साळुंखे (९८.७७), ऋषिकेश इंगळे (९८.६१), स्नेहा खटके (९८.४५), साईप्रसाद म्हसकर (९८.४३), अदिती खराडे (९८.४३), समर्थ मोरे (९८.१७), प्रणव पाटील (९७.९७), ओंकार धस (९७.९६), आदित्य शिंगाडे (९७.९६), वैष्णवी रेवटे (९७.९१), अवधूत घाडगे (९७.७७), आशिष घोरपडे (९७.७०), अभिजित ढोले (९७.५७), श्रुतिका पोळ (९७.३०), सौरभ लाड (९७.३०), संकेत पाटील (९७.१६) आणि आयेशा मेमन (९७.१०) यांनीही उत्कृष्ट यश संपादन केले.
आयआयटी व एनआयटीमध्ये निवडीचा मान
जोसा राऊंड-१ प्रवेश प्रक्रियेत संजना धस हिची आयआयटी बॉम्बे, राहुल गोडसे याची आयआयटी हैदराबाद, तर सायली लेंडवे हिची एनआयटी सुरतकल येथे निवड झाली. देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची झालेली ही निवड संस्थेच्या दर्जेदार शिक्षणाची आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाची साक्ष देणारी ठरली आहे.
मार्गदर्शन आणि परिश्रमांचे यश
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष प्रा. बाजीराव पाटील आणि उपाध्यक्ष प्रा. विजय लिगाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राध्यापकांचे सातत्यपूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे दैदिप्यमान यश शक्य झाल्याची भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
Comments
Post a Comment