नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांचा जनहिताय फाऊंडेशन कडून सत्कार ; वाहतूक शिस्त व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सहकार्याची ग्वाही; बापूसाहेब लांडगे यांच्याकडून शुभेच्छा
कराड, दि. १ विद्या मोरे : कराड शहर वाहतूक विभागाचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जनहिताय फाऊंडेशनच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करत वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम व नागरिकाभिमुख करण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
समाजहिताच्या विविध उपक्रमांत सातत्याने कार्यरत असलेल्या जनहिताय फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांनी संदीप साळुंखे यांचे अभिनंदन केले. वाहतूक शिस्त, रस्ते सुरक्षा, अपघात प्रतिबंध, जनजागृती आणि नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी काम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून नागरिकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत अधिक जागरूकता निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जनहिताय फाऊंडेशनच्या वतीने वाहतूक शिस्तीबाबत जनजागृती, रस्ता सुरक्षा अभियान, सामाजिक उपक्रम तसेच नागरिकांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये पोलीस प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही देण्यात आली. समाजाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे कार्य करणे ही काळाची गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
स्वागत समारंभास जनहिताय फाऊंडेशनचे सदस्य राजेंद्र ताटे तसेच कराड वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्या लोकाभिमुख, कर्तव्यदक्ष आणि प्रभावी कार्यशैलीबद्दल विश्वास व्यक्त करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थितांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने कराड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Comments
Post a Comment