डॉ. प्राची पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमचा पदग्रहण व पुरस्कार वितरण सोहळा : मनीषा पाटील अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणार; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव

 
कराड : विद्या मोरे; इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम (डिस्ट्रिक्ट ३१३, चार्टर क्र. ६११३) यांच्या वतीने सन २०२६-२७ या वर्षाच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ, इनरव्हील पुरस्कार वितरण सोहळा आणि क्लब बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा परिचय कार्यक्रम गुरुवार, दि. ९ जुलै रोजी स्व. वेणूताई चव्हाण सभागृह, कराड येथे दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.०० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

● डॉ. प्राची पाटील प्रमुख पाहुण्या :
या सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्राणा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा व समाजसेविका डॉ. प्राची पाटील उपस्थित राहणार असून त्या सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण आणि सेवाभाव या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

● मनीषा पाटील अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार :
पदग्रहण समारंभात मनीषा पाटील या अध्यक्षपदाची, तर हेमलता फुटाणे या सचिवपदाची धुरा स्वीकारणार आहेत. विठ्ठल नामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न होणार आहे.
● विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सन्मान :
याच कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कला, गिर्यारोहण आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना इनरव्हील पुरस्कार २०२६-२७ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

● पुरस्कारार्थींची नावे जाहीर :
यावर्षी सौ. विद्या मोरे ( सामाजिक कार्य ), डॉ. राहुल फासे (क्रीडा), दीपक बेलवलकर (गिर्यारोहण), देवदास मुळे (स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती), विकास पाटील काले (शैक्षणिक ) तसेच डॉ. सौ. अस्मिता फासे (कला) यांचा इनरव्हील पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

● नव्या कार्यकारिणीची घोषणा :
सन २०२६-२७ साठी अध्यक्ष मनीषा पाटील, उपाध्यक्षा सुषमा तिवारी, सचिव हेमलता फुटाणे, सहसचिव छाया पवार, खजिनदार शिवांजली पाटील, आय.एस.ओ. रत्नमाला शिंदे, सी.सी. नंदा आवळकर, संपादक विजयश्री मोहिते तसेच आय.पी.पी. सारिका शहा यांची निवड करण्यात आली आहे.
● चार्टर प्रेसिडेंट छाया पवार यांचे मार्गदर्शन लाभणार :
इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या संस्थापक अध्यक्षा (चार्टर प्रेसिडेंट) छाया पवार यांच्या नेतृत्वातून क्लबने सेवाभावी कार्याची भक्कम परंपरा निर्माण केली आहे. नव्या कार्यकारिणीला त्यांच्या अनुभवाचे व मार्गदर्शनाचे मोलाचे बळ लाभणार असून, क्लबची सामाजिक बांधिलकी आणि सेवाकार्य अधिक व्यापक करण्यासाठी त्या सातत्याने मार्गदर्शन करणार आहेत.

● संचालक मंडळ व विविध समित्यांची जबाबदारी :
कार्यकारिणी सदस्य म्हणून दिपाली लोहार, स्मिता शहा, राजश्री शहा, सारिका वेल्हाळ, प्रिया बोंगाळे आणि रजनी बोंगाळे यांचा समावेश आहे. सदस्यत्व समितीत निमिषा गोर, विद्या शहा, सपना लुणिया, मुस्कान तलरेजा, तर सल्लागार समितीत विद्या पावसकर, तरुणा मोहिरे, वृषाली पाटणकर आणि पुष्पा चौधरी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

● उपस्थितीचे आवाहन :
या पदग्रहण व पुरस्कार वितरण सोहळ्यास सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, इनरव्हील सदस्य आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष मनीषा पाटील, चार्टर प्रेसिडेंट छाया पवार, सचिव हेमलता फुटाणे आणि माजी अध्यक्षा सारिका शहा यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार