लोक सहभागातून आगाशिव डोंगर वनपर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार : डॉ. सुरेश भोसले'कृष्णा वनसंवर्धन प्रकल्प'अंतर्गत आठ वर्षांपासून हजारो देशी वृक्षांची लागवड; पर्यावरण संवर्धनाला नवी दिशा


कराड, ता. ११ :  विद्या मोरे ; पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी कृष्णा विश्व विद्यापीठाने राबविलेल्या 'कृष्णा वनसंवर्धन प्रकल्पा' अंतर्गत आगाशिव डोंगरावर वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी लोकसहभागाच्या बळावर आगाशिव डोंगराचा राज्यातील आदर्श वनपर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचा मानस व्यक्त केला.

आठ वर्षांची हिरवाईची वाटचाल

कृष्णा विश्व विद्यापीठाने २०१८ पासून महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाच्या सहकार्याने तसेच भिवडी (सातारा) येथील संकल्प सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या सहभागातून 'कृष्णा वनसंवर्धन प्रकल्प' सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत आगाशिव डोंगरावर हजारो देशी वृक्षांची लागवड व संवर्धन करण्यात आले असून, गेल्या आठ वर्षांत ओसाड टेकडी हिरवाईने नटू लागली आहे. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच जैवविविधतेलाही मोठी चालना मिळत आहे.
मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण

कार्यक्रमात कुलपती डॉ. सुरेश भोसले, सहाय्यक वनसंरक्षक विद्या घोडके आणि वनक्षेत्रपाल ललिता पाटील यांच्या हस्ते विविध देशी प्रजातींच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, पंचायत समिती सभापती सौ. नंदाताई यादव, उपसभापती सौ. अनिता वेताळ, पंचायत समिती सदस्य नरेंद्र नांगरे-पाटील, पैलवान धनंजय पाटील, दादासाहेब मरगळे, गोविंद गावडे, अर्जुन कराळे, सौ. वर्षा निकम, नियोजन व विकास सभापती सुरज शेवाळे, धनंजय गावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रकल्प विस्ताराची तयारी
यावेळी डॉ. भोसले म्हणाले, "गेल्या आठ वर्षांत या प्रकल्पाला उल्लेखनीय यश मिळाले असून हजारो वृक्षांची चांगली वाढ झाली आहे. वनविभागाने आणि मलकापूर नगरपालिकेने अधिक जागा उपलब्ध करून दिल्यास या प्रकल्पाचा विस्तार करण्यात येईल. स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागातून आगाशिव डोंगराला पर्यावरणपूरक वनपर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा आमचा संकल्प आहे."

देशी वृक्षसंवर्धनावर भर
प्रकल्पाच्या समन्वयक अर्चना कौलगेकर यांनी प्रास्ताविकात प्रकल्पाची सविस्तर माहिती देताना भारतीय देशी वृक्षप्रजातींच्या संवर्धनावर विशेष भर दिला जात असल्याचे सांगितले. कुलपती डॉ. सुरेश भोसले यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, वनविभागाचे सहकार्य आणि स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमामुळे हा प्रकल्प यशस्वीपणे पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

अधिकारी, स्वयंसेवक व विद्यार्थ्यांची उपस्थिती

यावेळी विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, प्रा. डॉ. विनोद बाबर, प्राचार्य डॉ. शशिकिरण, डॉ. जी. वरदराजुलू, डॉ. एन. आर. जाधव, रोटरी क्लबचे आनंदा थोरात, चंद्रशेखर पाटील, रोहन भाटे, वनपाल सुनिता जाधव, वनरक्षक रमेश जाधवर, कैलास सानप, संतोष पाटील, योगेश बेडेकर, सुनिल पाटील तसेच वनविभाग व विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी, एनसीसी कॅडेट्स आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार