जनहिताय फाऊंडेशनचे अध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांची मागणी; संविधान भवन व उर्दू शाळेचे काम तातडीने पूर्ण करा

 
कराड : विद्या मोरे ; मुजावर कॉलनी (ऑक्सिजन पॉंड परिसर) येथे मंजूर असलेल्या संविधान भवन व उर्दू शाळेचे बांधकाम तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करावे, अशी मागणी जनहिताय फाऊंडेशनचे अध्यक्ष बापू शंकर लांडगे यांनी कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कराड नगरपरिषदेची उर्दू शाळा सध्या कब्रस्तान परिसरातील खासगी जागेत भाडेतत्त्वावर सुरू असून इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. जागा खासगी मालकीची असल्यामुळे शाळेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नाही. जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या उर्दू शाळांपैकी ही एक शाळा असून विद्यार्थ्यांना अपुऱ्या सुविधा व असुरक्षित वातावरणात शिक्षण घ्यावे लागत आहे.

विद्यार्थ्यांना दररोज चिखल, खड्डे आणि धोकादायक रस्त्यांतून शाळेत ये-जा करावी लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मुजावर कॉलनी व परिसरातील हजारो नागरिकांच्या दृष्टीने या भागात नवीन उर्दू शाळा उभारणे अत्यंत गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

तसेच संविधान भवन उभारण्यात आल्यास सुमारे १० ते १२ हजार लोकसंख्या असलेल्या परिसरातील नागरिकांना सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज जागा उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांनाही अभ्यास व विविध उपक्रमांसाठी आवश्यक सुविधा मिळतील.

संविधान भवन व उर्दू शाळेचे बांधकाम कोणताही अडथळा न येता लवकरात लवकर पूर्ण करून शाळा सुरू करावी, अशी मागणी जनहिताय फाऊंडेशनचे अध्यक्ष बापू शंकर लांडगे यांनी केली.  राजेंद्र ताटे व राज चव्हाण उपस्थित

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार