जयवंत शुगर्समध्ये मिल रोलर पूजन उत्साहातआगामी गळीत हंगामाच्या तयारीला वेग; मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ
कराड, ता. १०: विद्या मोरे : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्यात आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कारखान्याच्या यांत्रिक विभागातील महत्त्वाच्या कामाचा शुभारंभ श्री. विनायक भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
धार्मिक विधीनंतर कामाचा प्रारंभ
कार्यक्रमाच्या प्रारंभी वैदिक मंत्रोच्चारात धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर श्री. विनायक भोसले यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन करण्यात आले. पूजनानंतर यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामास शुभारंभ करण्यात आला. उपस्थितांनी आगामी गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
यावेळी जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर, सरव्यवस्थापक (टेक्निकल) ए. बी. खटके यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे ओ.एस.डी. दादासाहेब मोहिते, वसंतराव पवार, आनंदा पाटील, एम. के. कापूरकर, नाना शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
कार्यक्रमास वर्क्स मॅनेजर एच. एम. नदाफ, प्रॉडक्शन मॅनेजर बी. जी. चव्हाणके, केन मॅनेजर नाथाजी कदम, मुख्य प्रशासकीय अधिकारी आर. टी. शिरसाट, डिस्टिलरी मॅनेजर व्ही. जी. म्हसवडे, पर्चेस ऑफिसर पी. एस. जाधव, ईडीपी मॅनेजर ए. एल. काशीद, मटेरियल मॅनेजर जी. एस. बाशिंगे, सीएचआर मॅनेजर व्ही. पी. जोशी, डेप्युटी चीफ अकाउंटंट दिलीप पेन्टेवार, सुरक्षा अधिकारी व्ही. टी. भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गळीत हंगामासाठी सर्व यंत्रणा सज्ज
आगामी गळीत हंगाम वेळेत सुरू करण्याच्या दृष्टीने कारखान्यातील यंत्रसामग्रीची देखभाल, दुरुस्ती व तांत्रिक चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. मिल रोलर बसविण्याच्या शुभारंभामुळे हंगामपूर्व तयारीला अधिक गती मिळाली असून, शेतकऱ्यांचा ऊस कार्यक्षम पद्धतीने गाळपासाठी स्वीकारण्याच्या दृष्टीने कारखाना प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
Comments
Post a Comment