पै. जालिंदर भाऊ जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त टायगर ग्रुपकडून गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
कराड, दि. २ : विद्या मोरे : सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने टायगर ग्रुप कराड तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा. पै. जालिंदरभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार (दि. २ जुलै २०२६) रोजी जिल्हा परिषद शाळा, वाकेश्वरनगर (ता. पाटण) येथे गरजू व अनाथ विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
● हा उपक्रम टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा. पै. जालिंदरभाऊ जाधव तसेच राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पै. तानाजीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
● शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी मोलाची मदत करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा या उपक्रमाचे खरे यश ठरला.
● यावेळी टायगर ग्रुप कराड तालुक्याचे सदस्य व समाजसेवक अनिलभाऊ ढेबरे, अमितदादा गोरवे, शुभमभाऊ आंबवडे, शाळेचे वर्गशिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
● उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मन लावून अभ्यास करण्याचे आवाहन केले. समाजातील गरजू घटकांसाठी अशा प्रकारचे सेवाभावी उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
● वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची टायगर ग्रुपची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिलेला हा मदतीचा हात उपस्थितांकडून कौतुकास पात्र ठरला.
Comments
Post a Comment