RE-NEET 2026 मध्ये लिगाडे-पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे दैदिप्यमान यश प्रा. बाजीराव पाटील, प्रा. विजय लिगाडे व राव सर यांच्या प्रभावी नेतृत्व व मार्गदर्शनाला यशाचे फळ
● कराड दि.१८; विद्या मोरे : RE-NEET 2026 परीक्षेत लिगाडे-पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट निकालामुळे महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालक, शिक्षक आणि हितचिंतकांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
● गुणवंत विद्यार्थ्यांची कामगिरी : महाविद्यालयातील स्वराली बाजीराव पाटील हिने 720 पैकी 608 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ शुभम जगताप (580), गौरव भोसले (564), प्रियांका उमरदंड (564), शिवकुमार माने (561), आदित्य पाटील (553), रेवती भोसले (542), रेवती जाधव (540), भक्ती भोईटे (526), अनन्या देशमुखे (523) आणि योगेश इंगवले (518) यांनी उत्कृष्ट गुण मिळवत महाविद्यालयाच्या यशात मानाचा वाटा उचलला.
● यशामागील नेतृत्व : या उल्लेखनीय यशामागे संस्थेचे अध्यक्ष प्रा. बाजीराव पाटील यांचे दूरदर्शी नेतृत्व, उपाध्यक्ष प्रा. विजय लिगाडे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि शैक्षणिक प्रमुख राव सर यांचे प्रभावी नियोजन मोलाचे ठरले. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करण्यासाठी महाविद्यालयाने केलेले नियोजन आणि शैक्षणिक वातावरण यामुळेच हा यशाचा आलेख अधिक उंचावला आहे.
● प्राध्यापकांचे मोलाचे योगदान : भौतिकशास्त्र विभागाचे जिमी सर, रसायनशास्त्र विभागाचे गायकवाड सर तसेच जीवशास्त्र विभागाचे प्रधान सर आणि जे. डी. सर यांनी विद्यार्थ्यांना विषयनिहाय सखोल मार्गदर्शन करून स्पर्धा परीक्षेची प्रभावी तयारी करून घेतली. त्यांच्या अथक परिश्रमांचे फळ विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशातून दिसून आले.
● अभिनंदनाचा वर्षाव : यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. बाजीराव पाटील, उपाध्यक्ष प्रा. विजय लिगाडे, शैक्षणिक प्रमुख राव सर, सर्व प्राध्यापक, पालक व हितचिंतकांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. गुणवत्तापूर्ण शिक्षण, नियमित मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम विद्यार्थी घडविण्याच्या महाविद्यालयाच्या ध्येयाला या यशामुळे आणखी एक मानाचा तुरा लाभल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
Comments
Post a Comment