ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी! ASI राजाराम जाधव, PC प्रशांत मोहितेंनी सापडलेला मोबाईल शोधून मुलाला केला परत
कराड : विद्या मोरे ; ड्युटीवर असताना सापडलेली वस्तू स्वतःकडे न ठेवता तिच्या मालकाचा शोध घेऊन ती प्रामाणिकपणे परत करण्याची घटना कराडमध्ये घडली. पोपटभाई पेट्रोल पंप येथे ड्युटी बजावत असताना ट्रॅफिक पोलीस ASI राजाराम सदाशिव जाधव आणि PC प्रशांत संभाजी मोहिते यांना एक मोबाईल फोन सापडला.
मोबाईल सापडल्यानंतर दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याच्या मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मोबाईलमधील उपलब्ध माहितीच्या आधारे संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर हा मोबाईल एका मुलाचा असल्याचे समोर आले.
त्यानंतर संबंधित मुलाला बोलावून घेण्यात आले. मोबाईलची योग्य खात्री करून घेतल्यानंतर ASI राजाराम जाधव आणि PC प्रशांत मोहिते यांनी तो मोबाईल सुरक्षितपणे मुलाच्या स्वाधीन केला. मोबाईल परत मिळाल्याने संबंधित मुलाने पोलिस कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
आजच्या काळात मोबाईल हा प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मौल्यवान वस्तू आहे. त्यामुळे मोबाईल सापडल्यावर त्याचा गैरवापर न करता प्रामाणिकपणे मालकाचा शोध घेऊन तो परत करण्याची पोलिस कर्मचाऱ्यांची भूमिका विशेष कौतुकास्पद ठरली आहे.
ट्रॅफिक नियंत्रणाची जबाबदारी पार पाडत असतानाच ASI राजाराम जाधव आणि PC प्रशांत मोहिते यांनी दाखविलेली प्रामाणिकता, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकी नागरिकांसाठी आदर्श ठरली आहे. त्यांच्या या कृतीमुळे ‘पोलीस केवळ कायदा-सुव्यवस्था राखत नाहीत, तर अडचणीत असलेल्या नागरिकांच्या मदतीलाही धावून येतात’ हा सकारात्मक संदेश समाजात गेला आहे.
या प्रामाणिक आणि माणुसकीपूर्ण कार्याबद्दल ASI राजाराम सदाशिव जाधव आणि PC प्रशांत संभाजी मोहिते यांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment