तिरंग्याला मानवंदना, जवानांचे दिमाखदार संचलन; कृष्णा विश्व विद्यापीठात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

कृष्णा विश्व विद्यापीठात ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करताना कुलपती डॉ. सुरेश भोसले. समवेत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा व उपकुलसचिव एस. ए. माशाळकर.                    
कराड, ता. १५ :  विद्या मोरे ; कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहाच्या वतीने कृष्णा विश्व विद्यापीठाच्या प्रांगणात भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साह, शिस्त आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. राष्ट्रध्वजाला मानवंदना, जवानांचे दिमाखदार ध्वजसंचलन आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.
ध्वजारोहण : कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

मानवंदना : ध्वजारोहणानंतर कुलपती डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा आणि उपकुलसचिव एस. ए. माशाळकर यांनी सुरक्षारक्षकांकडून मानवंदना स्वीकारली.

ध्वजसंचलन : कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहातील विविध सिक्युरिटी फोर्सचे जवान आणि विद्यार्थ्यांनी मुख्य सुरक्षा अधिकारी दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिमाखदार ध्वजसंचलन केले. शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
मान्यवर उपस्थिती : सौ. उत्तरा भोसले, सौ. गौरवी भोसले, श्री. विनायक भोसले, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, डॉ. रजनी गावकर, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्योत्स्ना पाटील, संशोधन संचालक (नि. ब्रिगेडियर) डॉ. हिमाश्री, डॉ. डी. के. अगरवाल, डॉ. एस. आर. पाटील, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे आणि डॉ. जी. व्ही. रामदास यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अधिकारी उपस्थिती : जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाच्या उपसंचालिका अर्चना कौलगेकर, अधिष्ठाता डॉ. युगंतरा कदम, डॉ. जी. वरदराजुलु, डॉ. वैशाली मोहिते, डॉ. गिरीश पठाडे, डॉ. एन. आर. जाधव, डॉ. शुभांगी पाटील आणि सहाय्यक कुलसचिव अस्मिता देशपांडे यांची उपस्थिती होती.

लोकप्रतिनिधी उपस्थिती : कराडचे नगरसेवक शिवाजी पवार, जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव, माजी नगरसेवक अतुल शिंदे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

देशभक्तीचा संदेश : स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून राष्ट्रध्वजाला अभिवादन करण्यात आले. शिस्त, एकता, सेवा आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश देत कृष्णा विश्व विद्यापीठातील ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार