विशेष मुलांच्या जीवनात ‘नक्षत्र’ची मायेची उब गोलेश्वरच्या प्रेरणांकित शाळेला महिनाभराचे अन्नधान्य व किराणा साहित्य; सेवा प्रकल्पाला दात्यांचे सहकार्य
कराड, ता. १२ : विद्या मोरे लायन्स क्लब ऑफ कराड नक्षत्रतर्फे गोलेश्वर येथील प्रेरणांकित विशेष मुलांच्या शाळेला एका महिन्यासाठी आवश्यक अन्नधान्य व किराणा साहित्य देण्यात आले. विशेष मुलांच्या गरजा लक्षात घेऊन राबविण्यात येणारा हा उपक्रम क्लबचा कायमस्वरूपी सेवा प्रकल्प म्हणून सुरू आहे.
यावर्षी शाळेच्या गरजेनुसार लायन्स क्लब ऑफ मसूरचे सचिव लायन दिलीप पाटील यांनी शाळेला प्रेशर कुकर भेट देत मोलाचे योगदान दिले. तसेच लायन्स क्लब ऑफ सातारा जनसेवाचे लायन श्याम चितळे यांनी या सेवा उपक्रमासाठी ₹५०० आर्थिक मदत केली.
विशेष मुलांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने मदतीचा हात देणाऱ्या सर्व दाते, हितचिंतक व सहकाऱ्यांचे क्लबतर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. विशेष मुलांच्या जीवनात आनंद, आधार आणि संधी निर्माण करण्यासाठी लायन्स परिवार सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या सेवा कार्यावेळी झोन चेअरमन लायन गौरी चव्हाण, अध्यक्ष लायन राजश्री पालकर, खजिनदार लायन विद्या मोरे, लायन इला जोगी आणि लायन हर्षदा इंगळे उपस्थित होते.
Comments
Post a Comment