तारुखमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागत जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी; महिलांकडून औक्षण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन

 

कराड : विद्या मोरे; पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्वकर्ते मनोजदादा जरांगे पाटील यांचे तारुख येथे मराठा बांधवांच्या वतीने उत्स्फूर्त वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या आगमनावेळी झालेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

मनोज जरांगे पाटील यांचे तारुखमध्ये आगमन होताच गावकऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण आणि पुष्पवृष्टी करत त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी पुष्पहार अर्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तारुख गावातील महिला भगिनींनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून मनोजदादांचे मनापासून स्वागत केले.

गावात दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्यांनी उपस्थित मराठा बांधवांशी संवाद साधला. मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी एकजूट, संघटन आणि सातत्यपूर्ण लढ्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

या स्वागत सोहळ्याला तारुखसह परिसरातील मराठा बांधव, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगवे झेंडे आणि भगव्या टोप्यांमुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी उपस्थितांमध्ये मोठा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवराज कुराडे पाटील, विवेक कुराडे पाटील, विक्रांत कुराडे पाटील, माजी पंचायत समिती सभापती प्रदीप पाटील, सरपंच सचिन कुराडे, सुहास पाटील आणि विक्रम पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार