सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या १३व्या स्मृतिदिनी मान्यवरांकडून अभिवादन कृष्णा काठच्या सहकार, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील योगदानाचे स्मरण

 स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व  मान्यवर.
कराड, ता. ५ : विद्या मोरे ; कृष्णाकाठच्या सहकार, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्राच्या विकासाला दिशा देणारे तसेच कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले.

पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील स्व. जयवंतराव भोसले यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजीत मोहिते, सौ. उत्तरा भोसले, पृथ्वीराज भोसले, विनायक भोसले यांच्यासह कराड व वाळवा तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे संचालक भरत पाटील, ज्येष्ठ नेते डॉ. अशोक गुजर, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक विक्रम पावसकर, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी चैतन्य कणसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कृष्णा कारखाना व सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जे. डी. मोरे, संचालक जगदीश जगताप, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, बाजीराव निकम, संग्राम पाटील, सुनीता शेवाळे, सुजाता जाधव तसेच माजी संचालक, सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही आप्पासाहेबांना अभिवादन केले.

कराड नगरपरिषद व राजकीय क्षेत्रातील मान्यवर सहभागी
कराडचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर, नगरसेवक सुहास जगताप, माजी नगराध्यक्ष सौ. रोहिणी शिंदे, माजी नगरसेवक अतुल शिंदे, तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मलकापूर नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, सार्वजनिक बांधकाम सभापती हणमंतराव जाधव, नियोजन सभापती सूरज शेवाळे, महिला व बालकल्याण सभापती सौ. गितांजली पाटील, नगरसेवक शरद पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनीही पुतळ्यास अभिवादन केले.
भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

भाजपाचे राज्य परिषद सदस्य हर्षवर्धन मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष पिनू जाधव, कराड शहराध्यक्ष सौ. सुषमा लोखंडे, मंडल अध्यक्ष शंकर निकम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष डॉ. सुधीर जगताप, वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे संजयबापू पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.

सहकार, बँकिंग व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक, कृष्णा बँकेचे संचालक, विविध सहकारी बँका व पतसंस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, व्यापारी तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

वारकरी संप्रदायाकडूनही अभिवादन

जयरामस्वामी मठाचे विठ्ठल महाराज तसेच वारकरी संप्रदायातील मंडळींनीही स्व. जयवंतराव भोसले यांच्या स्मृतींना अभिवादन केले. विविध सामाजिक व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही आप्पासाहेबांच्या कार्याचे स्मरण केले.
आप्पासाहेबांच्या कार्याला मान्यवरांकडून उजाळा

स्व. जयवंतराव भोसले यांनी कृष्णाकाठच्या सहकार, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्राच्या विकासासाठी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या विविध संस्था आणि उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचे कार्य आजही पुढे सुरू आहे. १३व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा देत उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली.

यावेळी सहकार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, बँकिंग आणि विविध क्षेत्रांतील असंख्य मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार