मा.श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना आमदार अतुलबाबा भोसले यांची भावपूर्ण श्रद्धांजली
कराड विद्या मोरे
कराडचे ज्येष्ठ साहित्यिक, ख्यातनाम ललित लेखक आणि ‘डोह’कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील, सर्जनशील आणि व्रतस्थ साहित्यिक हरपला, अशा शब्दांत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’ आणि ‘कोरडी भिक्षा’ यांसारख्या साहित्यकृतींमधून श्रीनिवास कुलकर्णी यांनी मराठी वाङ्मयाला समृद्ध केले. ग्रामीण जीवन, मानवी संवेदना आणि निसर्गाचे सूक्ष्म दर्शन त्यांच्या लेखणीतून प्रभावीपणे उमटले. अर्धशतकाहून अधिक काळ त्यांनी केलेली साहित्यसाधना सदैव स्मरणात राहील.
महाराष्ट्र शासनाचा २०२५ सालचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ तसेच विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव झाला. त्यांच्या निधनाने कराडच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचीही मोठी हानी झाली आहे.
श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना, असे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी म्हटले.
Comments
Post a Comment