माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ला. सुनील सुतार यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर; लायन्स क्लब नक्षत्रचा सामाजिक उपक्रम
कराड : विद्या मोरे ; माजी DG ला. सुनील सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब नक्षत्रतर्फे दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी यशवंत ब्लड बँक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी अचानक पुढाकार घेत रक्तदान करणारे उमेश दादा यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच ला. डॉ.सविता देवकर , ला. गौरी चव्हाण झोन चेअरपर्सन आणि ला. मेघना पाटील यांनीही रक्तदान शिबिर या उपक्रमात मोलाचे योगदान दिले.
रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांच्या सहकार्यामुळे शिबिराची अॅक्टिव्हिटी यशस्वीपणे पार पडली. सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदानासाठी पुढे आलेल्या सर्वांचे लायन्स क्लब नक्षत्रतर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
लायन्स क्लब नक्षत्रच्या माध्यमातून यापुढेही आरोग्य, सामाजिक सेवा आणि जनहिताचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमासाठी अध्यक्ष ला. डॉ. राजश्री पालकर आणि खजिनदार ला. विद्या मोरे यांनी सर्व रक्तदाते व सहकार्य करणाऱ्या सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
Comments
Post a Comment