आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिलेला शब्द पाळला! शाहू चौक ते सर्किट हाऊस मार्गावरील खड्डे बुजविण्यास प्रारंभ
कराड : विद्या मोरे
शाहू चौक ते सर्किट हाऊस या प्रमुख मार्गावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती.
नागरिकांच्या या समस्येची दखल घेत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार दिलेला शब्द पाळत या मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.
या कामाची पाहणी व देखरेख नगरसेवक आशुतोष डुबल, नगरसेवक विजय वाटेगावकर आणि नगरसेवक शिवाजी पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. रस्त्यावरील खड्डे प्राधान्याने बुजविण्यात येत असून, नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी याचा मोठा फायदा होणार आहे.
शाहू चौक ते सर्किट हाऊस हा शहरातील महत्त्वाचा मार्ग असल्याने या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताचा धोकाही निर्माण होत होता.
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी नागरिकांची समस्या गांभीर्याने घेत दिलेला शब्द अल्पावधीत पूर्ण केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment