राहुल गांधीं समोर पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले महाराष्ट्राचे ज्वलंत प्रश्नSIR प्रक्रियेपासून शेतकरी आत्महत्या, महिला सुरक्षा अन् शक्तीपीठ महामार्गावर सविस्तर चर्चा

 

कराड :  विद्या मोरे

लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान नाशिक येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी संवाद साधत महाराष्ट्रातील सद्य राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्याशी महाराष्ट्रातील विविध ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. SIR प्रक्रिया, वाढत्या शेतकरी आत्महत्या, महिला व बालकांवरील गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ, शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प तसेच नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चातील कथित अनियमितता व भ्रष्टाचार या महत्त्वाच्या विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये सखोल विचारविनिमय झाला.

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या, शेतकऱ्यांची बिकट आर्थिक परिस्थिती, युवकांमधील बेरोजगारी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न यावरही चर्चा झाली. जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी काँग्रेसने अधिक आक्रमकपणे मैदानात उतरण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह सामाजिक व आर्थिक परिस्थितीबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधी यांना सविस्तर माहिती दिली. जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी लढा उभारण्यासाठी काँग्रेस संघटनेला गावपातळीपासून राज्यपातळीपर्यंत अधिक मजबूत आणि सक्रिय करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करत राहील, असा विश्वास व्यक्त केला. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रश्नांवर झालेली ही चर्चा आगामी काळातील काँग्रेसच्या आंदोलनात्मक आणि संघटनात्मक भूमिकेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.


Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार