पृथ्वीराज चव्हाण यांचे आशीर्वाद घेत हर्षदा देशमुख-जाधव यांचा पदवीधरांच्या प्रश्नांसाठी कामाचा निर्धारन व निर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांशी सदिच्छा भेट; युवक व सर्वसामान्यांच्या प्रश्नांना विधिमंडळात वाचा फोडण्याचा संकल्प
कराड : विद्या मोरे
पुणे पदवीधर मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार म्हणून निवड झालेल्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कराड येथील पाटण कॉलनीमधील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पदवीधर, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना विधिमंडळात प्रभावीपणे वाचा फोडून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांनी निवडीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. पदवीधरांच्या समस्या, युवकांच्या अपेक्षा, शिक्षण, रोजगाराच्या संधी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना पदवीधर आणि युवकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे ही महत्त्वाची जबाबदारी आहे. जनतेच्या अपेक्षांची जाणीव ठेवून त्यांच्या समस्या विधिमंडळात प्रभावीपणे मांडाव्यात. तसेच जनहिताच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा करावा, असे मार्गदर्शन पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि काँग्रेसच्या विचारधारेनुसार पदवीधर, युवक तसेच सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय देणे, युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आणि जनहिताचे प्रश्न विधिमंडळात ठामपणे मांडणे यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाचे मार्गदर्शन पुढील वाटचालीत महत्त्वाचे ठरणार असल्याची भावना व्यक्त करत हर्षदा देशमुख-जाधव यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या सदिच्छा भेटीप्रसंगी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, सातारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष नामदेवराव पाटील, कराडचे उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, नगरसेवक सौरभ पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल पवार, NSUI जिल्हाध्यक्ष मुबीन बागवान, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ॲड. अमित जाधव, पंचायत समिती सदस्य रवींद्र बडेकर, सातारा जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल चव्हाण, लायन्स क्लब झोन चेअर पर्सन लायन गौरी चव्हाण, माजी नगराध्यक्षा अर्चना पाटील, महिला काँग्रेस अध्यक्षा महामूलकर, संगीता साळुंखे, सैदापूरचे नाना जाधव, सचिन पाटील, ॲड. एम. टी. देसाई, ॲड. पंडितराव हरदास, ॲड. धीरज जाधव, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, प्रशांत देशमुख, अक्षय सुर्वे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष देवदास माने, युवक काँग्रेस कराड दक्षिण अध्यक्ष चैतन्य पाटील, मलकापूर काँग्रेस अध्यक्ष सुधाकर शिंदे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment