चिमुकलीचा प्रामाणिकपणा अन् पोलिसांची तत्परता; हरवलेले पाकीट मालकाच्या स्वाधीन!
घाट परिसरात श्रेयाला एक पाकीट सापडले. त्यामध्ये पैसे असल्याचे लक्षात येताच तिने कोणताही मोह न ठेवता ते पाकीट प्रीतीसंगम पोलीस चौकीत नेऊन पोलीस कर्मचारी संग्राम संपतराव बाबर यांच्याकडे सुपूर्द केले.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (PI) दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संग्राम संपतराव बाबर यांनी या प्रकरणात तत्परता दाखवली. पाकिटाच्या मालकाची योग्य पडताळणी व खातरजमा केली. त्यानंतर पाकीट आणि त्यातील संपूर्ण रक्कम संबंधित व्यक्तीच्या स्वाधीन केली.
श्रेया हिच्या प्रामाणिकपणामुळे हरवलेली रक्कम मालकाला परत मिळाली, तर पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम संपतराव बाबर यांनी दाखवलेल्या कर्तव्यदक्षतेमुळे ही कार्यवाही यशस्वीपणे पूर्ण झाली.
एका चिमुकलीचा प्रामाणिकपणा आणि पोलिसांची तत्परता यांचा सुंदर संगम या घटनेतून पाहायला मिळाला. नागरिकांनी श्रेयाच्या प्रामाणिकपणाचे तसेच पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले.
Comments
Post a Comment