भाजपाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी अजय जामवाल यांचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन!पुढील सहा महिन्यांत प्रत्येक शक्तिकेंद्र सक्रिय करण्याचे लक्ष्य; कराडमध्ये पश्चिम महाराष्ट्र विभागाची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न

कराड, ता. ३ : विद्या मोरे : आगामी काळात भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्यासाठी बूथ, मंडल आणि शक्तिकेंद्र स्तरावरील संघटनात्मक बांधणीला प्राधान्य द्या. प्रत्येक शक्तिकेंद्र सक्रिय करून पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहोचवा, असे स्पष्ट निर्देश भाजपाचे प्रदेश संघटनमंत्री अजय जामवाल यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले.

कराड येथील द फर्न रेसिडेन्सीमध्ये भाजपाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाची संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, कार्यालयीन मंत्री रवी अनासपुरे, सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, आमदार धैर्यशील कदम, प्रदेश चिटणीस ॲड. वर्षाताई डहाळे, पश्चिम महाराष्ट्र संयोजक विक्रम पावसकर, प्रदेश सचिव शरद लाड, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना अजय जामवाल म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांत पक्षाने राज्य, जिल्हा आणि मंडल स्तरावर संघटनात्मक बांधणी मजबूत केली आहे. आता पुढील सहा महिन्यांत प्रत्येक शक्तिकेंद्र सक्रिय करण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. शक्तिकेंद्र सक्षम झाले तर त्याअंतर्गत येणारे बूथही अधिक प्रभावीपणे कार्यरत होतील. त्यामुळे प्रत्येक समितीने आपल्या कामाचा नियमित आढावा घेऊन संघटनात्मक कामकाजाची माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.

पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीत जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. जुने कार्यकर्ते हा पक्षाचा अनुभव आणि नवे कार्यकर्ते ही पक्षाची ऊर्जा आहेत. या दोघांच्या अनुभवाचा आणि ऊर्जेचा योग्य समन्वय साधल्यास पक्षसंघटना अधिक मजबूत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर अहवाल सादर केला. जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीचे काम पूर्णत्वाकडे जात असून, पक्षाच्या सर्व स्तरांवर नियमित बैठका घेऊन कार्याचा आढावा घेतला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

या बैठकीस सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, विभाग समन्वयक योगेश बाचल, सातारा जिल्हा सरचिटणीस याज्ञसेन पाटणकर, महिला जिल्हाध्यक्ष तेजस्विनी घोरपडे, पृथ्वीराज पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचा समन्वय आणि बूथ स्तरावरील सक्रियता या त्रिसूत्रीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार या बैठकीतून व्यक्त झाला.

Comments

Popular posts from this blog

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार

कराडमध्ये २१९७ रेशन कार्डधारक अपात्र; साहिला नायकवडे यांच्यासह संबंधितांची विभागीय चौकशी कराशासनाच्या अधिकृत यादीबाहेरील लाभार्थ्यांना कोणत्या निकषांवर अपात्र केले? वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे स्पीड पोस्टाने तक्रार; नियमबाह्य कार्यवाहीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाही ची मागणी २१९७ लाभार्थी अपात्र; प्रकरणाची विभागीय चौकशीची मागणी