कराड शहर काँग्रेसची ४५ सदस्यीय नूतन कार्यकारिणी जाहीर; ॲड. अमित जाधव यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा पृथ्वीराज चव्हाण व जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांच्या मान्यतेने नियुक्त्या; सहा उपाध्यक्ष, खजिनदार, सरचिटणीस व चिटणीसांसह नव्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी

 कराड : विद्या मोरे 

कराड शहरातील काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने कराड शहर काँग्रेस कमिटीची ४५ सदस्यीय नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण आणि सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव काशिनाथ पाटील (आप्पा) यांच्या मान्यतेने ही कार्यकारिणी निश्चित करण्यात आली आहे. ॲड. अमित वसंतराव जाधव यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कराड शहरात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ॲड. अमित जाधव यांची यापूर्वीच कराड शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले होते. त्यानंतर आता त्यांच्या नेतृत्वाखाली शहराची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

या कार्यकारिणीत सहा उपाध्यक्ष, एक खजिनदार, सहा सरचिटणीस आणि सहा चिटणीस यांच्यासह पदसिद्ध सदस्य, मार्गदर्शक सदस्य व कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे. शहरातील विविध पेठा, कॉलनी आणि प्रभागांमधील कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देत सर्वसमावेशक संघटनात्मक रचना तयार करण्यावर भर देण्यात आला आहे.

नूतन पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे :

उपाध्यक्ष (६)

१. विठ्ठल बाळकृष्ण शिखरे – सोमवार पेठ
२. सौ. अर्चनाताई अशोकराव पाटील – मंगळवार पेठ
३. रफिक हुसेन मुलाणी – शनिवार पेठ
४. अमीरहुसैन रहिमान मुल्ला (कटापुरे) – मुजावर कॉलनी
५. सुनील सुधाकर बरीदे – शनिवार पेठ
६. जितेंद्र रतनलाल ओसवाल – शुक्रवार पेठ

खजिनदार (१)

१. ॲड. इरशाद आजमुद्दीन खेरतखान – सोमवार पेठ

सरचिटणीस (६)

१. विक्रांत चंद्रकांत जाधव – शनिवार पेठ
२. अमितराज उत्तमराव माने – बुधवार पेठ
३. ॲड. नरेंद्र सदानंद चिंगळे – मार्केट यार्ड
४. अक्षय शिवाजी सुर्वे – रविवार पेठ
५. स्वातुल्यकुमार संपतराव सूर्यवंशी – बुरुड गल्ली
६. विनायक धोंडूसा चावडीमनी – शनिवार पेठ

चिटणीस (६)

१. शेखरान मौलाअली पठाण – मंगळवार पेठ
२. विनोद विश्वासराव डुबल – शुक्रवार पेठ
३. आशिष सुभाष जाधव – खराडे कॉलनी
४. युवराज शंकर भोसले – बुधवार पेठ
५. अखिल फकृद्दीन अंबेकरी – मुजावर कॉलनी
६. निसार महमदहुसेन शेख – शनिवार पेठ

जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील (आप्पा) यांच्या मान्यतेने जाहीर झालेल्या या कार्यकारिणीच्या माध्यमातून कराड शहरात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक व्यापक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविणे, युवकांसह सर्वसामान्य नागरिकांना पक्षाशी जोडणे आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविणे यासाठी नूतन पदाधिकारी काम करणार आहेत.

याशिवाय आगामी काळात पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात येणारी आंदोलने, विविध कार्यक्रम आणि संघटनात्मक उपक्रमांमध्ये कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. शहरातील विविध भागांमध्ये पक्षाची ताकद वाढविणे आणि जनतेशी थेट संपर्क प्रस्थापित करणे, ही नूतन कार्यकारिणीसमोरील प्रमुख आव्हाने असणार आहेत.

ॲड. अमित जाधव यांच्या नेतृत्वाखाली जाहीर झालेली ४५ सदस्यीय कार्यकारिणी कराड शहरात काँग्रेसला कितपत नवी उभारी देणार, तसेच आगामी राजकीय घडामोडींमध्ये पक्षाची भूमिका कशी राहणार, याकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार

कराडमध्ये २१९७ रेशन कार्डधारक अपात्र; साहिला नायकवडे यांच्यासह संबंधितांची विभागीय चौकशी कराशासनाच्या अधिकृत यादीबाहेरील लाभार्थ्यांना कोणत्या निकषांवर अपात्र केले? वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे स्पीड पोस्टाने तक्रार; नियमबाह्य कार्यवाहीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाही ची मागणी २१९७ लाभार्थी अपात्र; प्रकरणाची विभागीय चौकशीची मागणी