गोकुळच्या सत्ता समीकरणात हस्तक्षेप नको; शासननियुक्त चार सदस्यांचा मतदानाचा अधिकार रद्द करा!२५ पैकी १३ जागा जिंकलेल्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या लोकशाही कौलाचा आदर करण्याची कराड शहर काँग्रेसची मागणी

 
कराड : विद्या मोरे 

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत २५ पैकी १३ जागांवर विजय मिळवून राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने आपले बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे निवडणुकीत दूध उत्पादक सभासदांनी दिलेल्या लोकशाही कौलाचा आदर करण्यात यावा. शासननियुक्त चार सदस्यांना मतदानाचा अधिकार देऊन निवडून आलेल्या संचालक मंडळाचे सत्तासमीकरण बदलण्याचा प्रयत्न तातडीने थांबवावा, अशी मागणी कराड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. अमित वसंत जाधव यांनी केली आहे.

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून निर्माण झालेल्या या प्रश्नात शासनाने हस्तक्षेप करण्याऐवजी निवडणुकीत निवडून आलेल्या संचालकांचा अधिकार अबाधित ठेवावा, अशी भूमिका काँग्रेस कमिटीने मांडली आहे.

शासननियुक्त चार सदस्यांना मतदानाचा अधिकार देणारा अध्यादेश तातडीने रद्द करावा. त्यांच्या नियुक्तीबाबत फेरविचार करावा. अध्यक्षपदाची निवडणूक निवडून आलेल्या संचालकांच्या माध्यमातून कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडावी. या प्रक्रियेत कोणताही राजकीय दबाव किंवा बेकायदेशीर हस्तक्षेप होणार नाही, याची शासनाने दक्षता घ्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

सहकार क्षेत्रातील लोकशाही धोक्यात येऊ नये!

गोकुळ दूध संघाचा प्रश्न केवळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीपुरता मर्यादित नाही. हा सहकार क्षेत्राच्या स्वायत्ततेचा, लोकशाही मूल्यांचा आणि लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अधिकारांचा प्रश्न आहे. निवडणुकीत सभासदांनी दिलेला कौल हा सर्वोच्च मानला जावा. शासननियुक्त सदस्यांच्या मतदानामुळे निवडून आलेल्या संचालक मंडळाच्या निर्णयप्रक्रियेवर परिणाम होऊ नये, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

शासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संबंधित विभागाकडे तातडीने पाठपुरावा करावा. शासननियुक्त सदस्यांच्या मतदानाच्या अधिकाराबाबतचा अध्यादेश रद्द करून दूध उत्पादकांनी दिलेला लोकशाही कौल अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी कराड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. अमित वसंत जाधव यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार

कराडमध्ये २१९७ रेशन कार्डधारक अपात्र; साहिला नायकवडे यांच्यासह संबंधितांची विभागीय चौकशी कराशासनाच्या अधिकृत यादीबाहेरील लाभार्थ्यांना कोणत्या निकषांवर अपात्र केले? वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे स्पीड पोस्टाने तक्रार; नियमबाह्य कार्यवाहीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाही ची मागणी २१९७ लाभार्थी अपात्र; प्रकरणाची विभागीय चौकशीची मागणी